खचलेला “तो’ रस्ता दहा दिवसांत दुरूस्त

कालवा फुटीनंतरची घटना : दगडी भिंत बांधली

पुणे – जनता वसाहत राम मंदिराजवळील कालव्याकडेचा खचलेला रस्ता महापालिका पाणीपुरवठा विभागाने अवघ्या दहा दिवसांत दुरुस्त केला आहे. त्यासाठी कालव्याबाजूला 30 फूट लांब आणि 10 फूट उंच दगडी भिंत बांधण्यात आली आहे.
जनता वसाहतीमधील कालव्याच्या आतील बाजूची भिंत सुमारे 10 फूट कोसळली होती. त्यामुळे कालव्याला लावलेल्या सुरक्षा जाळ्याही तुटून पडण्याच्या स्थितीत असून कालव्यात पाणी सोडल्यानंतर हा रस्ता खचून दुर्घटना होण्याची शक्‍यता होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे पोलिसांनी हा रस्ता तातडीने बंद केला. तर, महापालिकेने तातडीने या रस्त्यासह कालव्याबाजूला असलेले इतर रस्ते बंद करावेत, असे पत्र पाटबंधारे विभागाने दिले होते. त्यामुळे पालिकेने कोणताही वाद न घालता तसेच दुरूस्तीचा खर्च कोणी करायचा, याची वाट न पाहता हे काम हाती घेत अवघ्या 10 दिवसात ही भिंत पुन्हा बांधली आहे. त्यामुळे आता कालव्यातून पाणी सोडण्यात आले तरी रस्त्याला कोणताही धोका राहणार नसल्याचे पालिकेच्या अधिकऱ्यांनी स्पष्ट केले.

पाहणी करून तातडीने दुरुस्ती

पाटबंधारे विभागाने दिलेल्या पत्रानुसार, कालव्याकडेच्या सर्व रस्त्यांची पाहणी महापालिकेच्या पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत असून जेथे रस्ता खचण्याची शक्‍यता अथवा इतर काही धोका असल्याचे आढळल्यास तेथे तातडीने दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)