क्रूड घसरल्यामुळे तेल कंपन्यांचे शेअर वधारले

मुंबई – गुंतवणूकदार सध्या सावध आहेत. अमेरिकेने पुढील महिन्यात व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकाडेवारी जाहीर होणार आहे. त्याचबरोबर काही राज्यांत निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे. या कारणामुळे सावध गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात नफेखोरी केल्यामुळे निर्देशांकात घट झाली.

शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.22 टक्‍क्‍यांनी म्हणजे 79 अंकांनी कमी होऊन 35158 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांनी कमी होऊन 10585 अंकांवर बंद झाला. मुख्य निर्देशांकांत जरी नफेखारीमुळे काही प्रमाणात घट झाली असली तरी शुक्रवारी मिड कॅप 1 टक्‍क्‍यापर्यंत वाढल्याचे दिसून आले.

मात्र स्थूल अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारत असल्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने काही देशांना ईराणकडून क्रुड आयात करण्याची परवाणगी दिल्यामुळे क्रुडचे दर 70 डॉलर प्रती पिंपापर्यंत खाली आले आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वर्धन बऱ्यापैकी होत असल्यामुळे परकीय गुंतवणूकदार परत भारताकडे वळू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात निर्देशांक स्थिर राहण्याची शक्‍यता काही ब्रोकर्सनी व्यक्त केली आहे.

जागतिक बाजारातही वातावरण फारसे सकारात्मक नव्हते. अमेरिकेने इराणला काही मोठ्या देशांना मर्यादित काळासाठी क्रूड निर्यातीची परवानगी दिल्यानंतर क्रूडचे दर 84 डॉलरवरून 70 डॉलर प्रति पिंपापर्यंत कमी झाल्याने एचपीसीएल, बीपीसीएल, आईल इंडिया या कंपन्यांचे शेअर 4.70 टक्‍क्‍यांपर्यंत वधारले. त्यांचा नफा वाढण्याची शक्‍यता आहे.
आजच्या नफेखोरीचा इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स, टाटा स्टिल, स्टेट बॅंक आणि आयटीसी या ब्लूचीप कंपन्यांवर परिणाम होऊन या कंपन्यांचे शेअर 2.15 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. तर एस बॅंक, एशियन पेंट, अदानी पोर्टस, सन फार्मा, मारुती कंपन्यांचे शेअर वधारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)