कोलकातामधील दमदम मार्केटमध्ये बाॅम्ब स्फोट; एक ठार, 9 जखमी

नवी दिल्ली – कोलकाता येथील गर्दीच्या दमदम बाजारात झालेल्या बाॅम्ब स्फोटात एका लहान मुलांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. दमदम बाजार हे कोलकातामधील एक प्रसिध्द मार्केट आहे. या घटनेनंतर लगेच सत्ताधारी पक्ष  तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी याच्यांत शाब्दिक युध्द सुरू झाले. तृणमूलच्या नेत्यांनी आरोप केले की, या स्फोटामागे त्याच्या पक्षाच्या नेत्यांना लक्ष करण्याची षडयंत्र होते.

या घटनेत मरण पावलेल्या सात वर्षीय मुलाचे नाव बिभाष घोष असल्याचे समजते आहे. राज्याचे शिक्षा  मंत्री आणि स्थानिक आमदार पुरेंदु घोष यांनी सांगितले की विभाष याचा मृत्यू एसएसकेएम रूग्णलयात उपचारादरम्यान झाला. या घटनेत मुलाची आई सुध्दा जखमी झाली आहे, तिच्यावर रूग्णलयात उपचार चालू आहेत.

-Ads-

पोलिसांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, या घटनेचा प्राथमिक तपास चालू आहे. हा एक देशी बाॅम्ब होता आणि कमी तीव्रतेचा बाॅम्ब होता. हा स्फोट 9.15 वाजता झाला. स्फोट इतका मोठा होता की जवळच्या इमारतीच्या काच तुटून सगळीकडे पसरल्या होत्या.  घटनेनंतर जखमींना लगेचच जवळच्या सरकारी रूग्णलयात दाखल करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)