सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचा मृत्यू

श्रीनगर – जम्मू-कश्मीरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये सीआरपीएफच्या जवानाने सहकाऱ्यांवरच गोळ्या झाडल्‍या आहेत. यामध्ये तीन ३ सीआरपीएफ जवान ठार झाले आहेत. ही घटना जवळपास १० वाजेदरम्यान घडली.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार,  कॅम्पमध्ये काही कारणांवरुन वाद झाल्‍यानंतर अजित कुमार या सीआरपीएफ कॉन्स्टेबलने आपल्‍या सर्व्हिस रायफलमधून सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्‍या. या गोळीबारात तीन जवानांचा मृत्यू झाला. सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्‍यानंतर त्‍याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर त्याला तात्‍काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)