पीक विमा योजना हा राफेलसारखाच मोठा घोटाळा : उद्धव ठाकरे

मोदींवर साधला निशाणा

बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादिवशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. केंद्र सरकारची पीक विमा योजना म्हणजे राफेलसारखाच मोठा घोटाळा आहे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर निघालेल्या उद्धव यांची बुधवारी बीड जिल्ह्यात सभा झाली. त्यावेळी विमा कंपन्यांना हप्ते देणाऱ्या किती जणांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना 2 ते 100 रूपयांचे धनादेश मिळाले. त्या योजनेत हजारों कोटींचा घोटाळा असल्याचे आरोप होत आहेत.

मी मन की बात नव्हे तर जन की बात करण्यावर विश्‍वास ठेवतो, असा शाब्दिक टोला त्यांनी मोदींना उद्देशून लगावला. तुम्ही (मोदी) दररोज वेगवेगळ्या देशांमध्ये जाता. आज रशियाला, उद्या जपानला तर नंतर चीनला. तिथे जाऊन आमचा देश बदलत असल्याचे सांगता. तुमच्यासाठी देश बदलत असेल; पण जनतेसाठी नाही. जनतेची स्थिती, यातना यांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. खरे बोलल्याने एक मतही मिळाले नाही तरी मला फिकीर नाही. मात्र, खोटे बोलूून निवडणुका जिंकण्याला माझा विरोध आहे.

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आणि अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यश आलेले नाही. न्यायालय निर्णय घेणार असेल; तर निवडणूक जाहीरनाम्यात आश्‍वासन का देता, असा सवालही त्यांनी भाजपला उद्देशून विचारला. युतीसाठी चर्चेचा विचार करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, अशा शब्दांत त्यांनी भाजपवरील शाब्दिक हल्लाबोल कायम ठेवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)