पिक विमा योजनेची अंमलबजावणी योग्य वेगाने

नवी दिल्ली – पीक विमा योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला यांनी सांगितले. या योजनेत असलेल्या काही त्रुटी सुधारल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत, दाखल झालेल्या विम्याचे दावे कापणीनंतर साधारणत: दोन महिन्यात विमा कंपन्यांकडून दिले जातात. त्यासाठी आवश्‍यक ती आकडेवारी उपलब्धता आणि संबंधित राज्यसरकारकडून योग्य वेळेत विमा हप्ता अनुदान मिळणे आवश्‍यक आहे. काही राज्यात आणि विभागात विम्याचे दावे उशीराने मिळत असल्याची माहिती असून संबंधित आकडेवारी मिळण्यात झालेला उशीर, आकडेवारी संदर्भात विमा कंपन्यांनी घेतलेली हरकत या सारख्या कारणांमुळे हा विलंब होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी केंद्र सरकारने या योजनेसाठी कार्यात्मक मार्गदर्शक तत्वात सुधारणा केली असून 2018-19 च्या रब्बी हंगामापासून ही मार्गदर्शक तत्वे लागू होत आहेत असे पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)