मुख्यमंत्री त्यांच्या बालबुद्धीला शोभेल असेच विधान करत आहेत – शरद पवार

संग्रहित छायाचित्र

अमरावती: भाजप-शिवसेना यांचा मेळावा अमरावती येथे पार पडला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले, आज अमरावतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. पण बालकांनी काही विधान केले तर ज्येष्ठांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचे नसते. मुख्यमंत्री त्यांच्या बालबुद्धीला शोभेल असेच विधान करत आहेत.

काय म्हणले होते देवेंद्र फडणवीस ?

अजित पवारांनी माझ्यावर टीका केली, की पवार साहेब मुख्यमंत्री असताना मी नर्सरीत होतो. मी शिकून मुख्यमंत्री झालो, अजित दादा तुम्ही कुठे राहिलात ते सांगा? पवार साहेबांना हवेची दिशा कळते. ही बाब अशोकरावाच्याही लक्षात आली. साहेबांनी 15 दिवसांत माघार घेतले. दुसऱ्या कॅप्टनने पत्नीला उभे केले. आमच्या समोर कोणताच कॅप्टन उभा राहत नाही. विरोधकांना आमच्या विरोधात बोलण्यासाठी काही मिळत नाही.

http://www.dainikprabhat.com/i-learned-chief-minister-ajit-dada-where-do-you-live-chief-minister/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)