जोकोव्हिचच्या सामन्याला ‘रोनाल्डो’ची हजेरी

लंडन – पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स मधील जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या नोवाक जोकोव्हिच आणि जॉन इस्नर यांच्या सामन्याला हजेरी लावली. तो त्याची मैत्रीण जोर्गीना रॉड्रिग्ज आणि मुलगा ख्रिस्तियानो ज्यूनियर यांच्यासह या सामन्याला उपस्थित होता. हा सामना जोकोव्हिचने केवळ 1 तास आणि 14 मिनीटांमध्ये 6-4, 6-3 असा आपल्या नावे केला.

या सामन्यानंतर जोकोव्हिच म्हणाला, ख्रिस्तियानो हा टेनिसचा चाहता आहे. तो माद्रीद ओपनमध्ये रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि माझे सामने पाहायला आला होता. मी त्याचा क्‍लब ज्युव्हेंटसच्या रंगाचे कपडे घालून खेळलो. त्यामुळे मला वाटते तो आनंदीत झाला असेल. तो त्याच्या कुटुंबासह आला होता. त्यामुळे तो लवकर निघून गेला . सामन्यानंतर त्याला भेटता न आल्याची मला लेखनात आहे. परंतु वेळ मिळाला तर मी त्याला पुढील आठवड्यात भेटेन, असेही त्याने यावेळी नमूद केले.

ही पहिलीच वेळ नव्हती जेव्हा ज्युव्हेंटस या स्टार खेळाडूने टेनिस सामन्याला उपस्थीत होता. मागील वर्षी जेव्हा तो रियाल माद्रीद संघासाठी खेळायचा तेव्हा माद्रीद ओपन स्पर्धंच्यावेळी राफेल नदाल विरुद्ध नोवाक जोकोव्हिच यांच्यातील उपांत्यफेरीच्या सामन्याला देखील हजर होता. त्या सामन्यात राफेल नादालने जोकोव्हिचला पराभूत करत विजय मिळला होता.

आपल्या नवीन क्‍लबसाठी रोनाल्डो फुटबॉलच्या मैदानात चांगला खेळ करत आहे. पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या मानाच्या बॅलन डीओर पुरस्काराच्या शर्यतीत असून हा पुरस्कार विक्रमी सहाव्यांदा जिंकण्यासाठी तो आशावादी आहे. अर्जेन्टिना आणि बार्सेलोनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी सह त्याने हा पुरस्कार पाच वेळा जिंकला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)