राज्यात पाण्याचे संकट गंभीर – राज्यपाल

12 प्रगतीशील शेतकऱ्यांना लॅपटॉपचे वाटप

मुंबई – राज्यात पाण्याचे संकट गंभीर रूप धारण करत असून अनेक तालुक्‍यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दृष्टीने पाण्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

जल व्यवस्थापन, फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, पशु संवर्धन यांसह विविध क्षेत्रात वैशिष्ट्‌यपूर्ण कामगिरी केलेल्या 12 शेतकऱ्यांना आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवन येथे लॅपटॉप भेट देऊन गौरव केला. जून महिन्यात दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहोळ्यात सन्मानित केलेल्या या शेतकऱ्यांना आपल्यातर्फे लॅपटॉप देण्याचे राज्यपालांनी आश्वासन दिले होते, त्यानुसार आज लॅपटॉप वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते. कृषी ही भारताची संस्कृती असून शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करीत देशाला अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण केले. मात्र आज शेतजमीन अनेक तुकड्यांमध्ये वाटली जाऊन शेतकऱ्यांकडील सरासरी जमीन अतिशय घटली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंगीकार केल्यास शेतकरी संपन्न होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

आजचा शेतकरी शिक्षित आहे. त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यामुळे कृषी संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. गटशेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे मत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.  संजय ज्ञानोबा शिंदे (नेकनूर, जि. बीड), ब्रम्हदेव नवनाथ सरडे, (सोगाव, जि. सोलापूर), दत्तात्रय गणपतराव गुंडावार, (भद्रावती, जि. चंद्रपूर), ईश्वरदास धोंडीबा घनघाव, (डोंगरगाव, जि. जालना), बाळासाहेब गीते, (जि. उस्मानाबाद), अशोक राजाराम गायकर, (जिल्हा रायगड), शरद संपतराव शिंदे, (जि. नाशिक), लक्ष्मण जनार्दन रासकर, (जि. नाशिक), सौ.विद्या प्रल्हाद गुंजकर, (जि. बुलढाणा), सुधाकर मोतीराम राऊत, (जि बुलढाणा), ताराचंद चंद्रभान गागरे (जि. अहमदनगर), श्रीकृष्ण सोनुने (जि. अहमदनगर) अशी पुरस्कारार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)