चिदंबरम कुटुंबियांवरील फौजदारी कारवाई रद्दबातल 

मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

चेन्नाई – आयकर विभागाने चिदंबरम यांच्या कुटुंबियांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा जो आदेश दिला होता तो मद्रास उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी, पुत्र कार्ती आणि सूनबाई श्रीनिधी यांनी आपल्यावर आयकर विभागाने कारवाईचा जो आदेश दिला आहे त्याला आव्हान देणाऱ्या याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.

त्या अनुषंगाने न्यायालयाने हा आदेश दिल्याने चिदंबरम यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. विदेशातील आपल्या मालमत्तांचा आयकर विवरणात उल्लेख न केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात ही कारवाई केली जाणार होती. चिदंबरम यांच्या कुटुंबियांची ब्रिटन मध्ये केब्रिंज येथे 5.37 कोटी रूपयांची मालमत्ता आहे. त्याची माहिती त्यांनी आयकर विवरण पत्रात दिली नव्हती असा आरोप आहे.

याखेरीज कार्ती चिदंबरम यांचे ब्रिटन मेट्रो बॅंकेत खाते असून अमेरिकेतील काही कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे असेही आयकर विभागाचे म्हणणे आहे. तथापी यावरून संबंधीतांवर अशा प्रकारची कारवाई करता येत नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला होता. तो ग्राह्य धरून ही कारवाई रद्द करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)