घंटागाडीच्या टेंडरमध्ये काटामारीचे राजकारण

ऑनलाईन मंजूर टेंडरला पुन्हा कात्रजचा घाट दाखवण्याच्या हालचाली

सातारा – सातारा पालिकेत घंटागाडीच्या टेंडरमध्ये काटामारीचे राजकारण सुरू झाले आहे.ऑनलाईन मंजूर टेंडरला पुन्हा कात्रजचा घाट दाखवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.या घाणेरडया खाऊ राजकारणामुळे पालिकेच्या इभ्रतीचा कचरा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आरोग्य विभागाने शहरातील चार भागांसाठी काढलेली स्वच्छतेची टेंडर प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे.सोलापूरच्या यशस्वी एंटरप्रायजेस 10 टक्के कमी दराने टेंडर भरत असताना दुसरीकडे ठाण्याच्या साई गणेशचे 5 टक्के कमी दराचे टेंडर मंजूर झाले.बगलबच्च्यांनाच टेंडर मिळावे यासाठी त्रुटी काढून इतर ठेकेदारांना बाद करण्यात आले असून,या टेंडर प्रक्रियेत गोलमाल झाल्याचे आरोप ठेकेदारांनी केले आहेत.

स्वच्छ व सुंदर सातारा करण्यासाठी सातारा विकास आघाडीने गेल्या वर्षी साशा कंपनीला 2 कोटी 83 लाखांचा स्वच्छतेचा ठेका दिला.या कंपनीला ठेका देऊन खर्च वाढला; मात्र शहराच्या स्वच्छतेच्या कामात फारसा फरक पडला नाही. शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाल्याने कामात कुचराई केली म्हणून साशाला लाखोंचा दंड झाला.

साशाच्या ठेक्‍याची मुदत संपण्यापूर्वी नवे टेंडर काढण्याऐवजी या कंपनीवर मेहरबानी दाखवून पुन्हा मुदतवाढ दिली. त्यानंतर सातारा पालिकेने शहरातील कचरा घरोघरी घंटागाडीने गोळा करून सोनगाव कचरा डेपोवर टाकण्यासाठी सुमारे 2 कोटी 57 लाखांचे टेंडर काढले. प्रत्येक मिळकतीवर दर आकारून साशाला टेंडर देण्यात आले. आता मात्र देण्यात आलेले स्वच्छतेचे टेंडर चार भागांसाठी वेगवेगळे मागवण्यात आले. प्रत्येक भागासाठी सुमारे 75 लाख रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता दिली.

पहिल्या भागासाठी सोलापूरच्या यशस्वी एंटरप्रायझेस, सचिन लेबर सप्लायर्स, आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. धुळे, ओरिएंटल फॅसिलिटी, स्व. वि. दा. सावरकर नागरी स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था, साई गणेश एंटरप्रायझेस ठाणे, मॅकविना असोसिएट्‌स, स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, हेना एंटरप्रायझेस, लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, गरुडझेप स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. या 11 ठेकेदारांनी टेंडर भरली होती.

दुसऱ्या भागासाठी यशश्री एंटरप्रायझेस, आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. धुळे, स्व. वि. दा. सावरकर नागरी स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था, साई गणेश एंटरप्रायझेस ठाणे, स्वयंभ ू ट्रान्स्पोर्ट, मॅकविना असोसिएट्‌स, स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, हेना एंटरप्रायझेस आणि ओरिएंटल फॅसिलिटी या 9 जणांनी याही ठिकाणी टेंडर भरली.
सावरकर संस्था वगळता उर्वरित 8 जणांनी या भागातील तरी कामाचे टेंडर मिळेल या आशेपोटी टेंडर भरली.

 

टेंडरशाहीचे सोलापूर कनेक्‍शन

सातारा पालिकेचे ठेकेदारीतील सोलापूर कनेक्‍शन कायम चर्चेत असते.जंतुनाशक केमिकल व पावडर सोलापूर वरूनच येते.साधारण दीड कोटी रूपयांचे आकडे पालिकेने यासाठी बघितले आहे.स्वच्छता टेंडरमध्ये पुन्हा सोलापूरचे ठेकेदार येऊ इच्छित असताना पालिकेतल्या सभ्य राजकीय ठेकेदारांनी त्यांना निविदेच्यातांत्रिक प्रक्रियेत बाद करण्याचे प्रयत्न चालवलेत.त्यामुळे पालिकेत सध्या सोलापुरी शीतयुद्ध पहायला मिळत आहे.शेवटच्या चौथ्या भागात सचिन लेबर,राजमाता अहिल्यादेवी होळकर, स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्था लि., आस्था स्वयंरोजगार सेवा सह. संस्था लि. धुळे, साईगणेश एंटरप्रायजेस, मॅकविना असोसिएट्‌स, स्वयंभू ट्रान्सपोर्ट, हेना एंटरप्रायजेस, लोकराज्य स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्था, ओरिएंटल फॅसिलिटी या 9 ठेकेदारांनी भाग घेतला.

टेंडर भरलेल्या बऱ्याच संस्था स्थानिक आहेत. मात्र, स्थानिकांना डावलून इतरांना टेंडर देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. टेंडर कमी दराने भरुनही केवळ जाणीवपूर्वक कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून टेंडर प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी केल्या आहेत. टेंडर बाद का केले? याचा कोणताही खुलासा नगरपालिकेने केलेला नाही. टेंडरमध्ये ज्या अटी-शर्थी होत्या त्याची पूर्तता करण्यात आली होती. मात्र, ज्या बाबी टेंडरमध्ये नमूद केलेल्या नव्हता त्याच बाबींची मागणी करुन टेंडर प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आल्याने या टेंडर प्रक्रियेची चौकशी करावी. टेंडर प्रक्रियेत गोलमाल झाला असून स्वच्छतेचे टेंडर रद्द करावे आणि पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे.

 

टेंडरशाहीचे सोलापूर कनेक्‍शन
सातारा पालिकेचे ठेकेदारीतील सोलापूर कनेक्‍शन कायम चर्चेत असते.जंतुनाशक केमिकल व पावडर सोलापूर वरूनच येते.साधारण दीड कोटी रूपयांचे आकडे पालिकेने यासाठी बघितले आहे.स्वच्छता टेंडरमध्ये पुन्हा सोलापूरचे ठेकेदार येऊ इच्छित असताना पालिकेतल्या सभ्य राजकीय ठेकेदारांनी त्यांना निविदेच्यातांत्रिक प्रक्रियेत बाद करण्याचे प्रयत्न चालवलेत.त्यामुळे पालिकेत सध्या सोलापुरी शीतयुद्ध पहायला मिळत आहे.शेवटच्या चौथ्या भागात सचिन  लेबर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्था लि., आस्था स्वयंरोजगार सेवा सह. संस्था लि. धुळे, साईगणेश एंटरप्रायजेस, मॅकविना असोसिएट्‌स, स्वयंभू ट्रान्सपोर्ट, हेना एंटरप्रायजेस, लोकराज्य स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्था, ओरिएंटल फॅसिलिटी या 9 ठेकेदारांनी भाग घेतला.

टेंडर भरलेल्या बऱ्याच संस्था स्थानिक आहेत. मात्र, स्थानिकांना डावलून इतरांना टेंडर देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. टेंडर कमी दराने भरुनही केवळ जाणीवपूर्वक कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून टेंडर प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी केल्या आहेत. टेंडर बाद का केले? याचा कोणताही खुलासा नगरपालिकेने केलेला नाही. टेंडरमध्ये ज्या अटी-शर्थी होत्या त्याची पूर्तता करण्यात आली होती. मात्र, ज्या बाबी टेंडरमध्ये नमूद केलेल्या नव्हता त्याच बाबींची मागणी करुन टेंडर प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आल्याने या टेंडर प्रक्रियेची चौकशी करावी. टेंडर प्रक्रियेत गोलमाल झाला असून स्वच्छतेचे टेंडर रद्द करावे आणि पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)