पेपर फुटीप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे

व्हॉटस  अॅपवरुन व्हायरल झाल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष

बीएसस्सी तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याआधी व्हायरल
 
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएसस्सी कंम्प्युटर सायन्सचे तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉटस ऍपहून व्हायरल होऊन फुटले होते, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि कंम्प्युटर सायन्सचे परीक्षा केंद्र रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर, कॉलेजच्या प्रशासनाने या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करायचे आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बीएसस्सी (कंम्प्युटर सायन्स) शाखेच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाचे पेपर पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर पंधरा दिवसांपूर्वी सुरू होती. या परीक्षेतील द्वितीय वर्षाचे आणि तृतीय वर्षाचे पेपर पाऊणतासआधी परीक्षा केंद्राहून व्हॉट्‌स ऍपद्वारे व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी डॉ. दिनेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती स्थापन केली होती. या समितीची बैठक शुक्रवारी विद्यापीठात झाली.

याला परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव आणि पदाधिकारी उपस्थित होते. चांदोरी येथील के. के. वाघ महाविद्यालयातून दि. 18 ऑक्‍टोबरचा बीएसस्सी कंम्प्युटर सायन्सचा तृतीय वर्षाचा परीक्षा पेपर सुरू होण्यापूर्वी व्हॉटस ऍपहुन व्हायरल झाला होता. त्यामुळे या कॉलेजचे परीक्षा केंद्र तत्काळ रद्द करावे, अशी शिफारस अहवालात केली आहे. त्यानंतर या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे प्रस्तावित केले आहे.

ही कारवाई कॉलेज प्रशासनाला करायची आहे. या दोन्ही कारवाई तातडीने करण्याबाबतचे सुचविण्यात आल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले. दरम्यान, या परीक्षेचे अनेक पेपर व्हॉट्‌स ऍरहुन व्हायरल होऊन फुटल्याचे परीक्षा देणारे विद्यार्थी सांगत आहे. अनेक परीक्षार्थ्यांच्या मोबाईलमध्ये हे पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी आल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. मात्र, केवळ आपल्यावर कारवाई होईल, या भीतीने हे परीक्षार्थी समोर येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात मनविसेने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)