देशद्रोहाचा गुन्हा आणि देशाचे संरक्षण मंत्री

कामगार नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. जॉर्ज फर्नांडिस यांचं वर्णन “बंद सम्राट’ असे केले जात असे. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले होते. समजावादी विचारांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. आणीबाणीनंतर त्यांनी मी सतत विरोधात राहणार, अशी भूमिका मांडली होती. आणीबाणीच्या काळात बडोदा इथे एका स्फोटासंदर्भात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला होता. ते जनता सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री होते. तर उद्योगमंत्री म्हणून त्यांनी कोकाकोला आणि आयबीएम या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

1994ला त्यांनी समता पक्षाची स्थापना केली होती. 1998मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते सहभागी झाले होते. त्याकाळात त्यांची संकटमोचक म्हणून भूमिका राहिली होती. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांना तिलांजली दिली, अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती. भाजपच्या नेतृत्वाखालील वाजपेयी सरकारमध्ये त्यांच्यावर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)