आपकडून गौतम गंभीर विरोधात फौजदारी तक्रार

नवी दिल्ली – भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी गौतम गंभीर विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर येत्या १ मे रोजी तीस हजारी कोर्टात सुनावणी होणार आहे.

अतीशी मार्लेना यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत, गौतम गंभीर यांना मत देऊ नका, कारण दोन मतदार ओळखपत्र असल्यामुळे ते आज किंवा नंतर अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे आपले मत वाया घालवू नका, असे त्यांनी म्हंटले आहे.

गौतम गंभीरकडे दिल्लीतील राजेंद्र नगर आणि करोल बाग या दोन्ही मतदारसंघातील मतदार कार्ड आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा देखील होऊ शकते, असे अतीशी मार्लेना यांनी पुढे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)