हामदाबाज येथे महिलेचा खून

सातारा तालुक्‍यातील घटना; काहीजणांची चौकशी सुरू

सातारा – हामदाबाज, ता.सातारा येथील महिलेचे हात-पाय प्लास्टिकच्या चिकट पट्टीने बांधून तोंडास प्लास्टिकची पिशवी बांधून खून केल्या घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणातील संशयितांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व सातारा तालुका पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

याबाबत माहिती अशी की, सातारा शहरालगत असणाऱ्या हामदाबाज येथील माती परीक्षण केंद्रात मिना आंनदराव देसाई (वय 50) राहत होत्या. त्या एका दवाखान्यात आयाचे काम करीत होत्या. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयिताने त्यांचे दोन्ही हात व पाय प्लास्टिकच्या चिकट पट्टीने बांधले. त्यानंतर तोंडास प्लास्टिकची पिशवी बांधून गळ्‌याभोवती चिकट पट्टी बांधून जिवे मारले.

याप्रकरणी त्यांची मुलगी पुनम शशिकांत शेलार (वय 29, रा. तामजाईनगर, करंजे) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम करीत आहेत. खून नेमक्‍या कोणत्या कारणासाठी झाला याबाबत उलघडा होऊ न शकल्याने संशयित आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत. दरम्यान सोमवारी दिवसभर स्थानिक गुन्हे शाखेने काही नातेवाईकांची चौकशी करून माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)