शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील वाघापूर येथे गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका आदिवासी कुटुंबातील 32 वर्षे महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलिसांनी अत्याचारासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघापूर शिवारातील वाकणावस्ती येथे एक आदिवासी कुटुंब एका शेतकऱ्याच्या शेतात सालाने कामाला आहे. दरम्यान गुरुवारी पीडित महिलेचा पती दुपारी कामासाठी बाहेरगावी गेला होता तर मुले शाळेत गेली होती. त्यामुळे महिला एकटीच घरी होती. या संधीचा फायदा घेत आरोपी संदीप उर्फ चंद्रकांत दत्तात्रय दिघे (वय-35 रा. वाघापूर) महिलेच्या घरात घुसून तिचे तोंड गळा दाबून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी महिलेने प्रतिकार करण्याचा व आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आजूबाजूला एकही घर नसल्याने या महिलेला आरोपीच्या तावडीतून वाचवण्यासाठी कोणीही आले नाही.

महिलेचा पती घरी आल्यानंतर तिने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर पीडित कुटुंबाने काही ग्रामस्थांच्या मदतीने शहर पोलिसात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी आरोपीच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)