सात तोळ्याचे मंगळसूत्र लंपास

पिंपरी  – शहरातील मंगळसूत्र चोरीचे सत्र थांबायला तयार नाही. निगडी येथे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे सात तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सविता मोहन गायकवाड (वय-43, रा. दत्तवाडी, निगडी) यांनी फिर्याद दिली असून एमएच 11, बीजे 7020 या क्रमांकाच्या दुचाकीवरील अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट उर्सुला शाळेजवळ कोपऱ्यावर सनिता या फळांची खरेदी करून जात असताना अज्ञात दोन चोरटे दुचाकीवरुन आले. त्यांनी काही क्षणात सविता यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे मनी मंगळसूत्र व 5 तोळ्याचे गंठण असे एकूण 7 तोळे वजनाचे व 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचा दागिना हिसकावून नेला. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)