पिंपरी – सासरवाडीत औषध आणि वस्तू घेण्यासाठी गेलेल्या तरुणास त्याच्या पत्नीने आणि सासूने मारहाण केली व चावा घेतला. तसेच तरुणाच्या आईला देखील जबर मारहाण केली. ही घटना बुधवार (दि.8) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चिंचवड मोहननगर येथील मंगलम अपार्टमेंट महावीर पार्क येथे घडली.
याप्रकरणी, नितीन रमेश निमराण (वय 34, रा. लोणावळा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी शीतल नितीन निमराण (वय 34, रा. महावीर पार्क, मोहननगर, चिंचवड) आणि सासू आशा अविनाश भोसले (वय 54) या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार रात्री नऊच्या सुमारास नितीन आणि त्याची आई हे दोघे पत्नी शीतल हिच्या मोहननगर येथील घरी औषध आणि काही वस्तू आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्याची पत्नी शीतल आणि तिची आई आशा यांनी नितीन आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली. तसेच नितीन याच्या हाताचा चावा घेऊन मारहाण केली. तसेच नितीन यांच्या आईचे डोके भिंतीला आपटून मारहाण केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.