मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा छळ

पिंपरी – मुलगा होत नाही म्हणून 32 वर्षीय विवाहितेचा पती व सासर मंडळींनी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती भूजंग कराड, दीर पोपट कराड, सासू सुमन कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2007 साली पीडिता व भुजंग यांचा विवाह झाला मात्र लग्नानंतर मुलगा होत नाही म्हणून सासरच्या लोकांनी छळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात करत तुला नांदायचे असेल तर मुलीच्या लग्नासाठी माहेरून 10 लाख रुपये आण म्हणत धमकी दिली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)