चेष्टने घेतला मित्राचा बळी

कामगारांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

नगर – एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला असलेल्या मित्रांमधील चेष्टाचा वाद खुनापर्यंत केल्याची घटना घडली आहे. प्रभूनाथ यादव (रा. वडगाव गुप्ता, नगर) याचा यात जीव गेला आहे. हरिकेश यादव (रा. भरपूर्वा, बिहार) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

प्रभूनाथ व हरिकेश एकाच कंपनीत कामाला आहेत. यांच्यात शनिवारी रात्री चेष्टा सुरू होती. या चेष्टेचे पुढे शिवीगाळ आणि मारामारीत रुपांतर झाले. ही भांडणे त्यांची मित्र अजय पटेल व सदीप यादव या दोघांनी सोडवली. दरम्यान, हरिकेश याचा चेष्टेतून झालेला अपमान सहन झाला नाही. प्रभूनाथ याच्या डोक्‍यात लोखंडी पाईप मारून त्याला जखमी केला. रविवारी पहाटे चारच्या सुमारास हरिकेश याने हा प्रकार केला.

रक्तस्त्राव झाल्याने प्रभूनाथ याचा जागीच मृत्यू झाला. संदीप यादव याने ही माहिती त्याचे ठेकेदार उदीत प्रसाद याला दिली. कंपनीचे मालक अजय सोनावणी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरिकेश याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)