एक लाख 85 हजारांसह सहीचे धनादेश लांबविले

नगर कॉलेज परिसरात दुचाकीवरील दोघा चोरांची हातचलाखी

नगर – नगर कॉलेज ते पराग बिल्डिंगपर्यंतच्या रोडवर दुचाकीवर दोघा चोरांनी हातचलाखी दाखवित मोटारगाडीच्या डिकीतून रोख रक्कम आणि सही केलेले धनादेश चोरून नेले. अभिषेक अशोक शिंदे (रा. साकत, शिराढोण, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

अभिषेक शिंदे हे मोटारगाडीत होते. त्यांनी गाडीच्या डिकीत पैसे ठेवले होते. 1 लाख 85 हजारांची रोख रक्कम आणि सही केलेले धनादेश होते. त्यात बॅक ऑफ इंडिया, एसबीआय, भिंगार अर्बन बॅंकचे धनादेश होते. बॅंक ऑफ इंडियाच्या तीन धनादेशवर त्यांनी स्वाक्षरी करून ठेवली होती. अभिषेक शिंदे यांच्यावर लक्ष ठेवून दोघा चोरांनी त्यांचा पाठलाग केला.

दुचाकीवरून हे चोर आले होते. अभिषेक हे नगर कॉलेज आणि पराग बिल्डिंगमध्ये काही कामास्वत थांबले होते. त्यावेळी ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दोन दिवसांपूर्वी माजी सैनिकाची रोख रक्कम चोरांनी या परिसरातून लांबवली होती. या चोरीनंतर ही लागोपाठ दुसरी चोरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)