संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग

पिंपरी -दुचाकीवरून चाललेल्या संगणक अभियंता तरुणीचा मोटारीतील दोन जणांनी विनयभंग केला. ही घटना हिंजवडी येथे शुक्रवारी (दि.29) रात्री घडली.

एमएच-14-सीके-2357 या मोटारीतील दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 26 वर्षीय संगणक अभियंता तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हिंजवडीतील रस्त्यावरून फिर्यादी तरुणी दुचाकीवरून चालली होती. त्यावेळी मोटारीतील आरोपी तिचा विनयभंग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)