विवाहितेचा छळ, तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी – कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पूर्णानगर, चिंचवड येथे घडली. पती राहुल मोहाडे, सासू कांताबाई मोहाडे, नणंद सोनाली काळे (रा. क्रिएटिव्ह पॅरडाईज, पूर्णानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत विवाहितेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लग्नापूर्वी पती राहुल हा परदेशात नोकरी करीत असल्याचे खोटे सांगून लग्नानंतर तुला नोकरी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी आपसांत संगनमत करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी या ऑफिसला जाण्यासाठी निघाल्या असता आरोपींनी त्यांच्या गाडीची चावी व मोबाईल काढून घेतला व मारहाण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)