एक वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

पिंपरी – जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या तपासी पथकाने निगडी येथून अटक केली आहे. अजय उर्फ जहरीला रामउजागीर चौधरी (वय-19 रा.ओटास्कीम, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय उर्फ जहीराला हा आरोपी जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. गेल्या एक वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखा युनिट दोन ने त्याला अटक केली.

परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना बातमी मिळाली की, रोकॉर्डवरील फरार आरोपी अजय हा रुपीनगर येथील चौकात थांबला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून तो फरार असल्याचे समजले. अजय याच्या विरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचाही गुन्हा असल्याचे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)