महिलेची अश्‍लील चित्रफीत बनवून उकळले 15 लाख

पिंपरी – गुंगीचे औषध देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची चित्रफीत काढणाऱ्या आरोपीने महिलेकडून 15 लाख रुपये उकळले. पैसे घेऊनही आरोपीने ही चित्रफीत महिलेच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश भारत पैलवान (रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबर 2011 ते 5 मार्च 2018 या कालावधीत आरोपीने पैलवान याने फिर्यादी महिलेला मिल्क पावडरच्या व्यवसायाचे आमिष दाखविले.

विश्‍वासात घेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि दिघी- मॅगझिन चौकात असलेल्या प्रगती लॉजिंग ऍण्ड बोर्डींग या लॉजवर नेले. तिथे महिलेला जबरदस्तीने दारूही पाजली. नशेत असलेल्या महिलेवर आरोपीने लैंगिक अत्याचार केले आणि त्याची चित्रफीतही काढली. ही चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 15 लाख 50 हजार रुपयांची खंडणी उकळली. पैसे घेऊनही चित्रफीत व्हॉटस्‌ऍप द्वारे नातेवाइकांना पाठवून महिलेची बदनामी केली.

याबाबत पीडित महिलेने बदलापूर पश्‍चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिथून पुढील तपासाकरिता हा गुन्हा दिघी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)