गर्भपात प्रकरणी तरुणावर गुन्हा

पिंपरी -प्रेमाचे खोटे नाटक करून तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली असून, अविनाश गहिनीनाथ बोरकर (वय-27, रा, पिंपरी, मुळ रा. वैगार, बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश याने पीडित तरुणीसोबत प्रेमाचे खोटे नाटक केले. आरोपीचे विवाहित असून त्याला मुले असल्याचे त्याने लपवून ठेवले होते. प्रेमाचे नाटक करुन आरोपीने पीडित तरुणीला गर्भवती केले व नंतर गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. याप्रकऱणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)