पिंपरी : भांडणात मध्यथी करणाऱ्यावर वार

पिंपरी -पत्नीला शिवीगाळ करून भांडण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या मेहुण्यावर चाकूने वार करण्यात आला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उषा दत्ता कांबळे (वय-31 रा. पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली असून दत्ता तुकाराम कांबळे (वय-40 रा. कळंब, उस्मानाबाद) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उषा व दत्ता हे विभक्त राहतात. यावेळी उषा सोबतच तिची मुले रहात असल्याने दत्ता हा शनिवारी (दि.23) मुलांना भेटण्यासाठी पिंपरी येथे आला होता.

यावेळी पत्नीने त्याला मुलांना भेटण्यास मज्जाव केला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. हे वाद मिटविण्यासाठी दत्ताचा मेहुणा सचिन चव्हाण याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दत्ता याने हातातील चाकूने सचिनच्या खांद्यावर व पोटावर वार केले. पिंपरी पोलिसांनी दत्ताला अटक केली असून पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)