पिंपरी : शटर उचकटून प्लेट चोरल्या

पिंपरी -कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी कंपनीतील 24 हजार रुपयांच्या तांब्याच्या प्लेट चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय शिवाजी गायकवाड (वय -29 रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली असून तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची भोसरी एमआयडीसी येथे अविनाश कार्गो नावाची कंपनी असून ते गुरुवारी (दि.21) रात्री कंपनी बंदकरून गेले असताना तीन अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर उचकटून कंपनीतील 24 हजार 622 रुपयांचे तांब्याचे प्लेट, ट्यूब चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शनिवारी (दि.23) उघडकीस आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)