दारू पिण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला

पिंपरी -दारू पिण्यासाठी नकार दिल्याने एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री निगडी येथे घडली. अतुल दिगंबर कसबे (वय 28, रा. राजनगर ओटास्कीम निगडी) असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या धरणे (पूर्ण नाव माहित नाही. रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास कसबे हे जेवण झाल्यानंतर ओटास्कीम परिसरात शतपावली करीत होते. त्यावेळी आरोपी सोन्या तिथे आला आणि कसबे यांना दारू प्यायला चल म्हणून जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. कसबे यांनी त्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपी सोन्या याने खिशातून चाकू काढून कसबे यांच्यावर कानामागे, डोक्‍यात, डाव्या हाताच्या बगलेत चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)