रिव्हॉल्व्हर रोखून तरुणावर चाकूने वार

पिंपरी – पूर्ववैमन्यस्यातून टोळक्‍यांनी रिवॉल्वरचा धाक दाखवत एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना पिंपळे सौदागर येथे गुरुवारी (दि.14) रात्री अकरा वाजता घडली. या प्रकऱणी हैदर जावेद सय्यद (वय-26 रा.पिंपळे गुरुव) यांनी फिर्याद दिली असून अतुल उर्फ चांड्या पवार, सनी परदेशी राहुल उर्फ दगड्या टोपणे व इतर तीन ते चार इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा मित्रासोबत पिंपळे गुरव येथील हॉटेल चुल्हा येथे जेवत बसले असताना तेथे हे टोळके आले व त्यांनी जुन्या भांडणाचा राग काढत त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हैदर याला रिवॉल्वरचा धाक दाखवून चाकूने उजव्या मांडीवर वार केले. हैदर तेथून पळून जात असता त्याचा पाठलाग ही केला. या प्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)