मोक्‍यातील पसार आरोपीला नगरमध्ये अटक

नगर – मोक्‍या कायद्यातील पसार आरोपी लोकेश परशुराम माने (वय 27, कैकाडी गल्ली, ता. बारामती, जि. पुणे) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. लोकेश माने याच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे.

बारामतीमधील मटका व्यावसायिकाचा खुनाचा त्याच्यावर आरोप आहे. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश गवळी, पोलीस कर्मचारी गणेश धोत्रे, नितीन गाडगे, संदीप धामणे, मुकुंद दुधाळ, प्रमोद लहार यांनी नाकाबंदीत ही कारवाई केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)