लुटण्याची तयारी, चौघे जेरबंद

चाकण – येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून रात्रपाळी सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या कामगारांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी चाकण पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक येथे रात्र गस्त घालत असताना निखील रतन कांबळे, महेश शिंदे, ओमकर बिसणारे व दोघे अल्पवयीन असे पाचजण संशयितरित्या आढळून आले त्यांच्याकडे असणाऱ्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडीची (एमएच 12 एलपी 5220) झडती घेतली असता गाडीमध्ये चाकू, कोयता, मिरची पूड मिळून आले, असे पोलिसांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)