महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

जामखेड – सासरी शिवणकाम करून कुटूंब चालवीत असलेल्या विधवा महिलेला तिचा दिर व जाऊ घरात शिवणकाम करायचे नाही, शेत जमिनीत वाटा मिळणार नाही तसेच वारंवार शिवीगाळ करून भांडणे करायची या त्रासाला कंटाळून या महिलेने आत्महत्या केली असल्याची फिर्याद या महिलेच्या वडीलांनी जामखेड पोलिसांत दिल्याने पोलिसांनी दिर व जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दादासाहेब भाऊसाहेब धुमाळ (रा. मुसळवाडी ता.राहुरी) यांनी फिर्याद दिली. माझी मुलगी रोहिणी शिवाजी पवार (वय 32 रा. पाडळी ता. जामखेड) हिचे 17 वर्षापूर्वी शिवाजी महादेव पवार यांच्याबरोबर लग्न झाले होते. तिला एक 15 वर्षाचा मुलगा आहे. तिचा पती शिवाजी पवार तीन महिन्यांपूर्वी मयत झाला आहे. त्यामुळे मुलगी रोहिणी व मुलगा पाडळी येथेच शिवणकाम करून चरितार्थ चालवीत असे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील दोन महिन्यांपासून मुलगी रोहिणीचे तेथेच राहणारे बबन महादेव पवार व त्याची पत्नी रेखा पवार हे रोहिणीला येथे शिवणकाम करायचे नाही. तुला शेतजमिनीत वाटा मिळणार नाही. शिवणकामासाठी येणाऱ्या लोकांना शिवीगाळ करून वारंवार भांडणे करीत असे. या त्रासाला कंटाळून रोहिणी हिने बुधवार दि. 23 रोजी सायंकाळी सहा वाजता घराच्या छताच्या लोखंडी हुकला गळफास लावून आत्महत्या केली. यासाठी बबन पवार व त्याची पत्नी रेखा हेच जबाबदार आहेत, अशी फिर्याद धुमाळ यांनी जामखेड पोलिसांत दिल्यावरून पोलिसांनी आत्महत्यास प्रवृत्त केले प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)