डिलिव्हरी बॉयकडून लिफ्टमध्ये विनयभंग

पिंपरी  – महिला लिफ्टमध्ये एकटी असल्याचा फायदा घेत हॉटेलच्या डिलिव्हरी बॉयने तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी पावणेसातच्या सुमारास वाकड येथे घडली. या प्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार धनराज काटेकर (रा. सांगवी) या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सकाळी नेहमीप्रमाणे वाकड येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर धुणीभांडी करण्यासाठी लिफ्टने जात होती. यावेळी पहिल्या मजल्यावर आरोपी काटेकर लिफ्टमध्ये घुसला. लिफ्टमध्ये महिला एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर येताच महिलेने तेथून पळ काढला. तिने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी आरोपी काटेकर हा हिंजवडी येथील सीझन्स हॉटेलचा डिलिव्हरी बॉय असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)