एक लाखांचा माल लंपास

पिंपरी – इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानातून 1 लाख 17 हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी दहाच्या सुमारास चऱ्होली येथे उघडकीस आली. प्रितेश पोपट शिवले (वय-29, रा. आझादनगर, च-होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितेश यांचे आझादनगरमध्ये सुखकर्ता इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता प्रितेश यांनी दुकान बंद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून टीव्ही, मोबाईल फोन, हेडफोन असा मान चोरून नेला. बुधवारी सकाळी प्रितेश यांनी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)