चोरट्या मटक्‍या प्रकरणी एक ताब्यात

नागठाणे – चोरटा मटका घेत असताना बोरगाव पोलिसांनी नागठाणे (ता. सातारा) येथून एकास ताब्यात घेतले. जाफिर अलिसाब नदाफ (रा. नागठाणे, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नागठाणे येथील दत्त चौकात चोरटा मटका घेतला जात असल्याची माहिती गुरुवारी सकाळी बोरगाव पोलिसांना समजली. सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुपारी छापा मारून संशयित जाफिर नदाफ याला चोरून कल्याण मटका घेत असताना ताब्यात घेतले.

त्याच्याजवळून रोख रक्कम व मटका जुगार साहित्य असा सुमारे 955 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)