लग्नाची मागणी करत युवतीला धमकी

सातारा – तू मला आवडतेस असे म्हणत लग्नाची मागणी करून तसे न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पिडीत युवतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यश गोरख उदागे रा.प्रतापसिंह नगर,सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.साताऱ्यातील एका उपनगरात राहत असलेल्या युवतीचा संशयीत सतत पाठलाग करत होता. वेळोवेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही केल्या पाठलाग थांबवत नव्हता. दि.26 रोजी पिडीत ही घरातून बाहेर निघाली तेव्हा संशयीताने पाठलाग करून थांबवले. त्यानंतर त्याने तू मला आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर पिडीतेने घडलेला प्रकार घरातील लोकांना सांगितला. याप्रकरणाचा तपास सातारा शहरच्या महिला पोलिस उपनिरीक्षक विजया वंजारी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)