दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी – माहेराहून दोन लाख घेऊन ये, असा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. शुक्रवारी (दि. 14) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी 26 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती अमोल उत्तम त्रिभुवन, सासू शशिकला उत्तम त्रिभुवन, सासरा उत्तम मनोहर त्रिभुवन आणि दीर महादेव उत्तम त्रिभुवन (सर्व रा. संजय गांधीनगर, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेकडे माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच महिलेस जीवे मरण्याची धमकी देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)