मामानेच केले भाच्याचे अपहरण; शिर्डीतील प्रकार

शिर्डी  – लग्न जमून दे, असे म्हणत सख्या मावस भावानेच बहिणीच्या आठ वर्षीय मुलाचे अपहरण केले. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार शिर्डी शहरात घडली. पोलिसांनी संबंधित मामाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असून, मुलाला त्याच्या आईच्या स्वाधिन करण्यात आले. हा प्रकार बुधवारी (दि.5) घडला.

दरम्यान, फिर्यादी सुनंदा गरुड (रा. शिर्डी) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब सोनवणे (वय 40, रा. परसखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा घरी आला होता. मुलगा आर्यन भाऊसाहेब गरुड (वय 8) यास चॉकलेटचे आमीष दाखवून त्याचे अपहरण केले.

फिर्यादीनंतर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके तयार करुन मुलाचा शोध सुरू करण्यात आला.दरम्यानच्या काळात तक्रारदार महिलेच्या मावस भावाने त्यांना फोन करुन तुमचा मुलगा आपल्या ताब्यात आहे. जिवंत हवा असेल, तर माझे लग्न जमवून दे, अशी धमकी देत पोलिसांत खबर दिल्यास मुलाचे बरेवाईट होईल, असा दमही दिला. मात्र ही सर्व बाब सदर महिलेने शिर्डी पोलिसांना सांगीतली. या प्रकारामुळे गरुड घाबरुन गेल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना धीर देत मुलाला सुखरूप सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन अपहरणकर्त्याचा शोध घेतला असता, अवघ्या सात तासांच्या आत सदर आरोपी सोनवणे यास परसखेडा (ता. कन्नड) येथून ताब्यात घेतले. तसेच आर्यनला सुखरूप त्याच्या आईकडे सोपविण्यात आले. आरोपीविरुद्ध शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी सोनवणे याचे आधिच तीन विवाह झाले आहेत. तरीही तो लग्नासाठी मुलगी पहा, अशी मागणी करत असल्याचे तक्रारदार महिलेने यावेळी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)