बेफाम वाहन चालविणारा पोलिसांच्या ताब्यात

पाचगणी – दारूच्या नशेत बेफाम वाहन चालविणाऱ्या इसमास पाचगणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी, रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाचगणी हॉलिडे होम हॉटेल समोरील वाई-पाचगणी या मुख्य रस्त्यावर दारूच्या नशेत बेफाम मारुती कार चालवली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी शिताफीने संबंधित इसमास ताब्यात घेतले आह. विष्णू निसाकर पांडा (रा. गोडवली, ता. महाबळेश्वर) असे संबंधित युवकाचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विष्णू पांडा याच्या विरोधात महाबळेश्‍वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)