दुचाकीवरून आलेल्या चोरांनी देहेरे गावाजवळ एकास लुटले

नगर  – प्रवरानगर येथून वसुलीची रक्कम घेऊन येणाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या चोरांनी देहेरे (ता. नगर) गावाजवळ येथे लुटले. चोरांनी 1लाख 56 हजार रुपयांची चोरून नेली. संजय कटारिया (रा. विनायकनगर, पुणे हायवे) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी जबरीचा चोरीचा गुन्ह्याची नोंद केली आहे.

कटारिया हे सेल्समनचे काम करतात. प्रवरानगर येथून वसुलीची रक्कम सुमारे 1 लाख 56 हजार रुपये ते नगरकडे घेऊन येत होते. त्यावेळी देहेरे गावाजवळ त्यांच्या दुचाकीमागून दोन चोर दुचाकीवरून आले. कटारिया यांच्या दुचाकीला चोरांनी त्यांची दुचाकी आडवी लावली. चोरांनी कटारिया यांच्या तोंडावर मारहाण केली. त्यात ते खाली पडले.

-Ads-

चोरांनी कटारिया यांच्याकडील रक्कम असलेली बॅग काढून घेत पळ काढला. कटारिया यांनी या प्रकाराची तक्रार एमआयडीसी पोलिसांकडे केली. चोरांनी ही चोरी पाळत ठेवून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या लुटीच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीही लुटीची घटना घडली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)