अखेर ‘त्या’ नराधमावर गुन्हा

पिंपरी – बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याप्रकरणी आरोपीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने मृत बाळाला जन्म दिला. त्यामुळे हा सारा प्रकार उघडकीस आला. यामध्ये पीडितेच्या घरच्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर अखेर पोलिसांनी फिर्यादी बनून गुन्हा दाखल केला आहे.

शाम शिंगाडे (पूर्ण नाव माहिती नाही. रा. वचपे, ता. आंबेगाव जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) आंबेगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर उपचार सुरु असताना तिने मृत बाळाला जन्म दिला. यावेळी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा आरोप पिंपरी- चिंचवड वूमेन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीकडून केला गेला. मात्र मुलीच्या घरच्यांनी कोणतीही तक्रार देण्यास नकार देत मृत बाळाची परस्पर विल्हेवाट लावत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समितीने याबाबत पिंपरी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी गुन्हा घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)