मोटारीची काच फोडून दागिन्यांची चोरी

नगर – मोटारीची काच फोडून चोरांनी 85 हजार रुपयांचे दागिने बुरूडगाव रोडवरून पळविल्याची घटना घडली आहे. विक्रम बाबाजी नवले (रा. कान्हूर पठार, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

विक्रम नवले हे त्यांची मोटार घेऊन बुरूडगाव येथील जुन्या जकात नाक्‍यासमोरील वैशाली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आले होते. विक्रम यांनी बहिणीकडे जाण्यापूर्वी काचा व्यवस्थित बंद करून मोटार घरासमोर उभी केली होती. मोटारीतील सिटवर बॅग ठेवलेली होती.

-Ads-

चोरांनी मोटारीचा काच फोडून त्यातील बॅगची उचकापाचक करून त्यात ठेवलेले 85 हजार रुपयांच्या दागिन्यांची पर्स चोरून नेली. विक्रम हे पुन्हा मोटारीकडे आल्यावर त्यांना झालेला प्रकार माहित झाला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)