सावेडीत घरफोड्यांचे सत्र सुरूच

वेगवेगळ्या चोरीत चोरांची लाखांवर हातसफाई

नगर  – तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या घरफोड्यांचे सत्रांना ऐन दिवाळीच्या सणात तेजी आली आहे. शहर पोलिसांना या चोऱ्या रोखण्यात अपयश येऊ लागले आहे. औरंगाबाद रोडवरील फिरोदिया बंगल्यामागे वकिलाच्या घरातून 1 लाख 65 हजार, तर नामदेव चौकातील नोकरदाराच्या घरातून 2 लाख 19 हजार 500 रुपयांचा, असा एकूण 3 लाख 84 हजार 500 रुपयांच्या ऐवजावर चोरांनी हातसफाई केली आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अॅड. यशवंत कानवडे यांचे घर आहे. बंद घरावर कुलूप तोडून चोरांनी घरातून रोख रक्कम चोरांनी चोरून नेली. या रकमेच्या चोरीनंतर चोरांनी अॅड. कानवडे यांचे वाहन देखील चोरून नेले. कानवडे यांनी तोफखाना पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रवींद्र बबे यांचे नामदेव चौकात घर आहे. चोरांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. घरातील सोन्या-चांदीचे सुमारे 2 लाख 19 हजार 500 रुपयांचे दागिने चोरून नेले. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या दोन्ही चोरीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली आहे. तोफखाना पोलिसांना चोरांचा शोध घेण्याचा सूचना करत सावेडीत गस्त वाढवा, असेही मिटके यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)