नियोजन करून शेवगावच्या व्यापाऱ्याची लूट

पोलिसांकडून पाच जणांना अटक : लुटीमागे नगरचा मास्टर माईंड

मोठ्या रकमेच्या वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त

दिवाळी सणाची सर्वत्र लगबग आहे. आर्थिक व्यवहार या दिवसात अधिक होत आहे. त्यामुळे पाळत ठेवून लूट, चोरी आणि घरफोड्या होत आहेत. नागरिकांनी या काळात अधिक सर्तक रहावे. मोठ्या आर्थिक रकमेची वाहतूक करताना पोलीस बंदोबस्त घ्यावा. तो पुरवला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

नगर – शेवगावच्या व्यापाऱ्याला नगर-औरंगाबाद महामार्गावर लुटण्याचा प्रकार हा नियोजित होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या लुटीत पाच जणांना अटक केली असून, यातील चौघे हे आष्टीतील (जि. बीड) आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीपक सखाराम केदारी (रा. बुरुडगाव, नगर), गणेश दत्तात्रय आजबे (वय 22, रा. कानिफनाथ वस्ती, शिराळ, ता. आष्टी), आदम जलाल शेख (वय 19, रा. फक्राबाद, ता. जामखेड), युवराज दिलीप राऊत ऊर्फ अशोक (वय 28, रा. वाळुंज, ता. आष्टी) व कैलास दत्तू तोडकर (वय 22, रा. मंगरूळ, ता. आष्टी) असे अटक केलेल्यांची युवकांची नावे आहेत.

या लुटाची मास्टर माईंड नगरमधील दीपक केदारी हा आहे. चोरीची सुमारे 5 लाख 75 हजार रुपये, मोटारगाडी, दुचाकीचा असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल आणि चाकू पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धूमस्टाईलच्या चोऱ्या रोखण्यासाठी फिक्‍स पॉईंट

दिवाळी सणामुळे शहरासह जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. बाजारपेठांमध्येही गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेऊन धूमस्टाईलने चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत फिक्‍स पॉईंट लावण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्याचेही पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.

व्यापारी समीर दसपुते व त्यांचे मित्र रवींद्र शेळके हे नगरमधून कापसाचे 8 लाख 45 हजार 700 रुपयांचे पेमेंट घेऊन शेवगावकडे निघाले होते. मोटारीतून प्रवास करत असताना दसपुते व शेळके यांना इमामपूर (ता. नगर) येथे चौघा चोरांनी लुटले होते.

मोटारीतून आलेल्या या युवकांनी ही लूट शस्त्राचा धाक दाखवून केली होती. हा लुटीचा प्लान हा नियोजीत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी खबऱ्यांमार्फत माहिती घेत तपास सुरू केला. हा प्लान नगरमधील दीपक केदारी याने रचला असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केदारी याला ताब्यात घेतले. त्याने लुटीची माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी इतर चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी लुटीच्या साडेआठ लाख रुपयांपैकी 5 लाख 75 हजार रुपये जप्त केले आहे. 30 हजारांची मोटारसायकल, चार लाख रुपयांची मोटारगाडी पोलिसांनीही ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेली मोटारगाडी ही गणेश आजबे याच्या वडील दत्तात्रय याच्या नावावर आहे. लूट करताना या मोटारगाडीचा क्रमांक बदलण्यात आला होता, हे देखील तपासात पुढे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)