सव्वादोन लाख रूपयांच्या एेवजावर चोरांचा डल्ला

नगर  – कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यात दोन जबरी चोरी आहेत. चोरांनी या तीन चोरींमध्ये सुमारे 2 लाख 16 हजारांचा ऐवज लांबवली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरांनी सोनसाखळी आणि जबरीने मोबाईल चोरून नेला आहे. दुचाकीवरील चोरांची शहरात सणासुदीला दहशत वाढली आहे. त्यामुळे शहरात सायंकाळी फिक्‍स पॉईंट लावण्याची मागणी होत आहेत.

अर्चना शेळके (वय 23) या युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील चोरांनी लांबवली. कल्याण रोडकडून लिंकरोडने केडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गायके मळ्यात हा प्रकार झाला. अर्चना या दुचाकीवरून प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्या दुचाकीमागून काळ्या रंगाची दुचाकी आली. ही दुचाकी पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट घातलेला व्यक्ती चालवत होती. त्याने तोंडावर रुमाल बांधलेला होता.

या दुचाकीवरील चोराने अर्चना यांच्या गळ्यातील 20 हजार रुपयांची सोनसाखळी ओढून चोरून नेली. चंद्रकांत मुळे (वय 55) या व्यक्तीचा आठ हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरांनी लांबविला. चंद्रकांत मुळे या पत्नीसह मार्केटयार्डमधून रेल्वेस्टेशनकडे जात होते. लोखंडी पुलावर आले असताना त्यांच्या दुचाकीला चोरांनी दुचाकी आडवी घातली. त्यांच्याकडील आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरांनी काढून घेतला.

संजित माणिक मंडल (वय 32, हल्ली रा. माळीवाडा, नगर) हा युवकाला चार चोरांनी लुटले. गंजबारातील जैन मंदिरामागून संजित सायकलीवरून चालला होता. त्यावेळी संजित याच्या सायकलीला दागिने असलेली पिशवी होती. त्यात सुमारे 1 लाख 88 लाखांचे दागिने होते. चौघा चोरांनी संजित यांच्या सायकलीला असलेली दागिन्यांची पिशवी चोरून नेली. हे चोर दुचाकीवरून आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)