पिंपळे-सौदागर मध्ये तरुणावर चाकूने वार

पिंपरी -विनाकारण तरूणाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच चाकूने डोळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी पिंपळे-सौदागर पोलीस चौकीच्या मागे घडली.

सौरभ धनवटे (रा. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश माधव कांबळे (वय-20, रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) हा गंभीर जखमी झाला असून त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभने शुक्रवारी दुपारी आकाशला पिंपळे-सौदागर येथील पोलिस चौकीमागे घेऊन गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेथे त्याला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. फिर्यादीने मला का मारतो, असे विचारल्यानंतर आरोपीने चाकूने त्याच्या डोळ्यावर वार करून गंभीर जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)