भुतकरवाडीत पाच जणांनी एकाला केली मारहाण

नगर – भुतकरवाडी येथे किरकोळ कारणावरून एकाला चौघांनी मारहाण केली आहे. तुषार सुंबे (रा. भिंगारदिवे मळा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला आहे. विशाल उमेश भागवत, अभिजीत त्रिभूवन, सिद्धाथ उकांडे, भूषण ससे व कुमार ससे (सर्व रा. भिंगारदिवे) या पाच जणांविरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

हे पाच जण सुंबे यांच्या घरात घुसून गणेश कोठे आहे, याची विचारणा केली. त्यावर सुंबे यांनी त्यांना विचारणा करत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या पाच जणांना त्याचा राग आला त्यांनी सुंभे मारहाण केली.

लाभाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत तू मध्ये आलास, तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. तोफखाना पोलिसांनी सुंभे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)