क्रिकेट सट्टेबाजांना काळेवाडीतून अटक

पिंपरी -क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने काळेवाडीमध्ये रंगेहात पकडले. मनीष राजकुमार तलरेजा (वय-41, रा. विजयनगर काळेवाडी), नितीन तिरंतदास कुकरेजा (वय-35, रा.धर्मा अपार्टमेंट, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी टी-20 सिरीज सिडनी थंडर विरूद्ध मेलबर्न स्टार्स या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा मारून आरोपींना अटक करत टीव्ही, सेट टॉप बॉक्‍स, नऊ मोबाईल, रायटिंग पॅड, लॅपटॉप असे 1 लाख 15 हजार 105 रुपयांचे साहित्य जप्त केले.

ही कारवाई खंडणी दरोडा पथकाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पुरुषोत्तम चाटे, कर्मचारी गणेश हजारे, राजेंद्र शिंदे, अजय भोसले, विक्रांत गायकवाड, आशिष बोटके, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे, नितीन खेसे, अनिता जाधव यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)