कर्ज फेडण्यासाठी नर्सरी व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

वडगाव मावळ  – कर्ज फेडण्यासाठी आठ वर्षांपूर्वी विकलेल्या जमिनीच्या मालकाला आरोपीने दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच दगडाने नर्सरीचे कार्यालय व पॉलिहाऊसचे नुकसान केले. सांगवी येथे बुधवारी (दि. 19) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास माऊली रोझ नर्सरीमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी शनिवारी (दि. 22) वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्‍वर विक्रम मांडलिक (वय 45, वतननगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तक्रार दिली. विकास गोपीचंद लालगुडे (रा. सांगवी, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास लालगुडे यांनी फिर्यादी ज्ञानेश्‍वर मांडलिक यांना आठ वर्षांपूर्वी शेत जमीन विकली होती. त्या जमिनीचे सर्वच रक्‍कम त्याच वेळी देण्यात आली होती. त्यानंतर आरोपी विकास लालगुडे हा कर्जबाजारी झाला आहे.

डोक्‍यावरचे कर्ज फेडण्यासाठी आठ वर्षांपूर्वी विकलेल्या जमीन मालकाला आरोपी लालगुडे यांनी माऊली रोझ नर्सरीचे कार्यालयात गेले. तिथे गेल्यावर फिर्यादी ज्ञानेश्‍वर मांडलिक यांना हाताने मारहाण शिवीगाळ दमदाटी केली. दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. दगडाने कार्यालयाचे पत्रे, काचा फोडून तसेच पॉलिहाऊसचे प्लॅस्टिक कागद फाडून 30 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

फिर्यादी मांडलिक यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यावरून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला अद्यापही अटक करण्यात आले नाही. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)